Wednesday, February 25, 2009

Risk

One of the funniest Marathi composition I have ever read...

Enjoy..

रिस्क
दारु पितांना मी कधीच रिस्क घेत नाही,
मी संध्याकाळी घरी येतो, तेंव्हा बायको स्वयंपाक करीत असते
शेल्फमधील भांड्यांचा आवाज येत असतो,
मी चोर पावलाने घरात येतो,
माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो,
शिवाजी महाराज
फोटोतुन बघत असतात,
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही .....
कारण मी कधीच रिस्क
घेत नाही....

वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरून मी ग्लास काढतो ,
चटकन एक पेग भरून आस्वाद घेतो,
ग्लास धुवून पुन्हा फळीवर ठेवतो,
अर्थात बाटलीही काळ्या कपाटात ठेवतो,
शिवाजी महाराज मंद हसत असतात,
स्वैपाकघरात डोकावून बघतो,
बायको कनिकच मलत
असते,
या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही ....

मी : जाधवांच्या मुलीच्या लग्नाचं जमल का ?
ती : छे, दानात असेल तर मिळेल ना चांगलं स्थळ !

मी परत बाहर येतो, काळ्या कपाटाच्या दाराचा आवाज होतो,
बाटली मात्र मी
हळूच काढतो,
वापरात नसलेल्या फळीच्या मोरीवरून ग्लास काढतो,
पटकन पेग
चा आस्वाद घेतो,
बाटली धुवून मोरीत ठेवतो,
काला ग्लासपण कपाटात ठेवतो,
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही .....
कारण मी कधीच रिस्क घेत नाही ...

मी : अर्थात जाधवांच्या मुलीचं अजून काही लग्नाचं वय झालं नाही ?
ती : नाही काय ! अट्ठावीस वर्षाची घोडी झालीये म्हणे !
मी : ( आठवून जीभ चावतो) अच्छा अच्छा ....

मी पुन्हा काळ्या कपाटातून कणीक काढतो,
मात्र कपाटाची जागा आपोआप बदललेली असते,
फळीवरून बाटली काढून पटकन मोरीत एक पेग मारतो,
शिवाजी महाराज मोठ्याने हसतात,
फळी कणाकेवर ठेवून शिवाजींचा फोटो धुवून मी काळ्या कपाटात ठेवतो,
बायको गैसवर मोरीच ठेवित असते,
या बाटली
चा त्या बाटलीला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही ....

मी : (चिडून) जाधवांना घोड़ा म्हणतेस? पुन्हा बोललीस तर जीभच कापून टाकेन तुझी ....!
ती : उगीच कटकट करू नका ... बाहेर जाउन गप्प पडा ...

मी कनकेवरून बाटली काढतो,
काळ्या कपाटात जाउन एक पेग मळतो,
मोरी धुवून फळीवर ठेवतो,
बायको माझ्याकड़े बघत हसत असते,
शिवाजी महाराजांचा स्वयंपाक चालूच असतो,
पण या जाधवांचा त्या जाधवाना पत्ता लागत नाही
कारण मी कधीच रिस्क घेत नाही ....

मी : (हसत हसत ) जाधवांनी घोडीशी लग्न ठरवल म्हणे !
ती : (ओरडून) तोंडावर पाणी मारा ...

मी परत स्वयंपाक घरात जातो, हलूच फळीवर जाउन बसतो,
गैसही फळीवरच असतो,
बाहेरच्या खोलीतून बाटल्याचा आवाज येतो,
मी डोकावून बघतो, बायको मोरीत दारूचा अस्वाद घेत असते,
ह्या घोडीचा त्या घोडीला पत्ता लागत नाही,
अर्थात शिवाजी महाराज कधीच रिस्क घेत नाही...
जाधवांचा स्वयंपाक होईपर्यंत ...
मी फोटोतुन बायकोकड़े बघत हसत असतो,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही ....

1 comment:

I think... said...

Ghar, Shivaji Maharaj, Bayko, kale kapat, mori, batli, glass, swayampak ghar.... bapre, mi kadhich risk ghet nahi...